शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (12:18 IST)

आता ट्रक चालक एसी केबिनमध्ये बसून ट्रक चालवतील, नितीन गडकरीं यांची घोषणा

nitin
ट्रक चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2025 पासून सर्व ट्रक केबिन एसी म्हणजेच वातानुकूलित असतील. आता  11-12 तास घाम गाळणाऱ्या ट्रकचालकांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. याची गरज अनेक दिवसांपासून जाणवत होती. कामाची परिस्थिती आणि रस्त्यावरील जास्त तास चालणे हे ड्रायव्हरचा थकवा आणि अपघात यांच्याशी जोडलेले आहेत. व्होल्वोसारख्या जागतिक ट्रक निर्मात्या आधीच एसी केबिन बनवत आहेत. यावर भारतात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे आणि आता 2025 पासून भारतीय कंपन्यांना एसी केबिन बनवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रक चालकांसाठी एसी केबिनचा प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणा केली. इंडस्ट्री अपग्रेड करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने 2016 मध्ये पहिल्यांदा हा प्रस्ताव मांडला होता.
 
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "आपल्या देशात काही ड्रायव्हर 12 किंवा 14 तास गाडी चालवतात, तर इतर देशांमध्ये बस आणि ट्रक ड्रायव्हर्सना ड्युटीचे तास निश्चित असतात. आमचे चालक 43 ते 47 अंश तापमानात गाडी चालवतात, त्यामुळे आम्हाला चालकांच्या स्थितीची कल्पना येऊ शकते. मला मंत्री झाल्यावर एसी केबिन सुरू करायच्या होत्या, पण त्यामुळे खर्च वाढेल असे सांगून काही लोकांनी विरोध केला. 19 जून 2023 रोजी मी फाइलवर सही केली आहे.आता 2025 पर्यंत ट्रक चालक एसीच्या केबिन मध्ये बसून ट्रक चालवतील. 
 
Edited by - Priya Dixit