सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अभिनंदनला मारहाण करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा

भारताच्या मिग-२१ लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. सुभेदार अहमद खान असे अभिनंदनला मारहाण करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचे नाव आहे. तो पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कार्यरत होता. 
 
नियंत्रण रेषेवर १७ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवा सेक्टरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास खान मदत करीत होता. या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवताना पाककडून समोरील भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला जात होता. याला भारतीय जवानांनी गोळीबाराने चोख प्रत्युत्तर दिले होते. या गोळीबारात खानचा मृत्यू झाला आहे.