शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (19:15 IST)

EXCLUSIVE: गुजरातमध्ये सागरी मार्गाने घुसखोरी करत होते पाकिस्तानींना 300 कोटी रुपयांच्या ड्रग्ज व शस्त्रांसह अटक

indian coast guard
अहमदाबाद. पाकिस्तानींनी ड्रग्ज आणि शस्त्रे घेऊन सागरी सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ते गुजरातमधील ओखा येथून देशाच्या सीमेत प्रवेश करत होते. पण, तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने त्यांचा डाव हाणून पाडला. कोस्टगार्ड आणि एटीएसने 300 कोटी रुपयांच्या ड्रग्ज आणि शस्त्रांसह आरोपींना पकडले. सागरी सीमेवर शस्त्रसाठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एटीएसने या सामानासह दहा पाकिस्तानींना अटक केली आहे. आरोपींकडून 6 पिस्तूल आणि 120 राऊंड जप्त करण्यात आले आहेत.
Edited by : Smita Joshi