राम मंदिरांच्या नावाने फेक वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे

ram janmabhumi ayodhya
नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 22 जून 2021 (16:27 IST)
लाखो राम भक्तांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक बातमी नोएडातून समोर येत आहे. यावर नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असून, पाच जणांना अटक केली आहे.
प्रकरण असे आहे की, अयोध्या रामजन्म भूमी ट्रस्टच्या नावाने बनावट वेबसाईट (Shri Ram Janmabhoomi Trust Website) बनवून, कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने 5 जणांना अटक केली आहे. यावेळी पाच आरोपींकडून 5 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 सिम, तब्बल 50 आधार कार्ड, 2 थंब इंप्रेशन मशीन असे साहित्य जप्त केले आहे.

नेमके प्रकरण काय?
सदर आरोपी सध्या दिल्लीत राहत होते. मुख्य म्हणजे सर्व आरोपी इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी असल्याचीही माहिती आहे. सदर आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या (Ayodhya Ram Mandir) या नावाने एक वेबसाईट सुरू केली. हे सर्व काम बेकायदेशीररित्या सुरू होते, तसेच याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, ज्यांना रामजन्म भूमीसाठी दान करायचे आहे, त्यांच्यासाठी एक बँक अकाउंट नंबर देण्यात आला होता.
जानेवारी महिन्यात राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल कुमार मिश्रा यांनी अयोध्यातील रामजन्म भूमी ठाण्यात रिपोर्ट दाखल केला होता, की राम जन्मभूमी ट्रस्टच्या वेबसाईटवर लोक मंदिराच्या निर्माणासाठी देणगी जमा करत आहेत. मात्र ज्यावेळी काही राम भक्तांनी त्यांनी जमा केलेल्या देणगीबाबत विचारपूस केली, त्यावेळी दिलेले पैसे ट्रस्टच्या खात्यात पोहोचले नसल्याचे त्यांनी सांगितले.
याच दरम्यान तपास सुरू झाला, आणि तपासात असे आढळले, की फेक वेबसाईट बनवून इंटरनेटवर लोकांना त्या फेक वेबसाईटवरील बँक खात्यात देणगी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या बँक खात्याचा तपास करण्यात आल्यानंतर फेक वेबसाईटवर हे खाते उघडण्यात आल्याचे समोर आले आणि, याच खात्यात लाखो राम भक्तांनी त्यांचे पैसे मंदिरासाठी जमा केले होते.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

आर्यन खानचे एनसीबीनं कौन्सिलिंग केल्याचे पुरावे दाखवा : ...

आर्यन खानचे एनसीबीनं कौन्सिलिंग केल्याचे पुरावे दाखवा : नवाब मलिक
आर्यन खानवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवरून नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यात गेल्या काही ...

ओडिशात जन्मले 2 डोके आणि 3 डोळ्यांचे वासरु

ओडिशात जन्मले 2 डोके आणि 3 डोळ्यांचे वासरु
ओडिशाच्या नबरंगपूरमध्ये ए

Breaking : राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

Breaking : राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा
पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला ...

देशभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, लखीमपूर ...

देशभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, लखीमपूर जिल्ह्यात अतिरिक्त फौज तैनात
नवी दिल्ली. कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी आज लखीमपूर घटनेचा निषेध करून रेल रोको ...

फेसबुक लाईव्ह चित्रीकरण करणे जीवावर बेतलं,रेल्वेखाली येऊन ...

फेसबुक लाईव्ह चित्रीकरण करणे जीवावर बेतलं,रेल्वेखाली येऊन तरुण मुलाचे  प्राण गेले
सध्या तरुण पिढीमध्ये काही वेगळे करून त्याचे चित्र किव्हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...