शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (13:36 IST)

PM Kisan yojana: PM किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची यादी जाहीर

पीएम किसान लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची रक्कम लवकरच जारी करणार आहेत. किसान योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते येथे जाणून घ्या. 
 
NIEM नुसार, PM किसान योजनेचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला. तर दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान जारी केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवले जातात. म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याचे पैसे जमा होतील.
 
याप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा-
1. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in .
2. आता त्याच्या होमपेजवर Farmers Corner निवडा. 
3. शेतकरी कॉर्नर विभागातील लाभार्थी यादीवर क्लिक करा. 
4. आता ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर तुम्ही 'Get Report' वर क्लिक करा. 
6. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
 
याप्रमाणे हप्त्याची स्थिती तपासा
1. यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
2. आता उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर(Farmers Corner) वरजा. 
3. यानंतर तुम्ही Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
4. आता समोर एक नवीन पेज उघडेल.
5. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.