शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (15:26 IST)

किडनीच्या समस्येमुळे पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद रुग्णालयात दाखल

PM Modi Brother Admitted पंतप्रधान मोदींचे धाकटे भाऊ प्रल्हाद मोदी यांना चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रल्हाद यांना किडनीशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5 भावंडे असून त्यात प्रल्हाद चौथ्या क्रमांकावर आहे. प्रल्हाद अहमदाबादमध्ये किराणा दुकान चालवतात आणि शहरात टायरचे शोरूमही आहे.
 
पीएम मोदींना एक बहीण आणि 4 भाऊ आहेत. सोमा मोदी, अमृत मोदी, पंकज मोदी, प्रल्हाद मोदी आणि बहीण वासंती मोदी. सोमा मोदी हे आरोग्य विभागातून निवृत्त झालेले पंतप्रधानांचे मोठे बंधू आहेत. सध्या सोमा मोदी अहमदाबादमध्ये वृद्धाश्रम चालवतात.