1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (12:20 IST)

PM मोदींच्या संपत्तीत वाढ तर अमित शाहांच्या संपत्ती घट

PM Narendra Modi's net worth increased
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल झालेल्या संपत्तीच्या विवरणातून ही बाब समोर आली आहे.
 
पीएमओच्या माहितीनुसार, ३० जून रोजी पंतप्रधान मोदींची निव्वळ संपत्ती २.८५ कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी त्यांची संपत्ती २.४९ कोटी रुपये होती. त्यांच्या बँक खात्यात ३.३ लाख रुपये जमा झाल्याने तसेच गुंतवणुकीची ३३ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याने ही वाढ दिसून येत आहे.
 
दरम्यान, जून महिन्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींकडे ३१,४५० रुपये रोख रक्कम होती. तर गांधीनगरच्या एसबीआय बँकेच्या खात्यात २,३८,१७३ रुपये रक्कम होती. त्याचबरोबर याच शाखेत मोदींची मुदत ठेव असून विविध प्रकारे जमा झालेली रक्कम १,६०,२८,९३९ इतकी आहे. 
 
पंतप्रधानांकडे ८,४३,१२४ रुपयांची राष्ट्रीय बचत पत्रे, १,५०,९५७ रुपयांच्या एलआयसी पॉलिसीज आणि २०,००० रुपयांचे करबचतीचे इन्फ्रा बॉण्ड्सही आहेत. तर १.७५ कोटी रुपयांची अस्थावर संपत्ती आहे.
 
गृहमंत्री अमित शाह यांची निव्वळ संपत्ती २८.६३ कोटी रुपये आहे, जी गेल्या वर्षी ३२.४ कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुनलेत शाह यांच्या संपत्तीत ४ कोटी रुपयांनी घट झाली आहे.