1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (06:47 IST)

यु.पी.एस.सी.चीच्या स्थगित केलेल्या मुलाखती २० जुलैपासून

Postponed interviews
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध नागरी सेवांसाठी घेतली जाणारी २०२० साठीची पूर्व परीक्षा येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहे. ही परीक्षा ३१ मे रोजी होणार होती. मात्र कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलली होती.
 
याशिवाय गेल्या वर्षीच्या पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची व्यक्तिमत्व चाचणी २० जुलै पासून होईल असंही आयोगानं जाहीर केलं आहे.