गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (17:29 IST)

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

Underworld don Dawood Ibrahim
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या पत्नीलाही करोनाचा संसर्ग झाला असल्याचे पाकिस्तानमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. 
 
मीडिया रिर्पोट्सनुसार दाऊदला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे समजते. दाऊद आणि त्याच्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली होती. मात्र आता दाऊदला करोना झाला असून त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयामध्येच उपचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. 
 
१९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण मालिका बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये फरार असलेला गँगस्टर कुठे असतो आणि त्याच्या कुटुंबातील लोकांबद्दल खूप कमी लोकांना माहीती असते. दाऊच्या पत्नीचं नाव महजबीन उर्फ जुबीना जरीन आहे. दाऊद आणि जुबीनाचे चार मुलं आहेत. तीन मुली माहरुख, माहरीन आणि मारिया, आणि एक मुलगा मोइन आहे.