बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (10:33 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन सिटीमध्ये घेणार पोप फ्रान्सिस यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हवामान बदलासंबंधीच्या COP-26 आणि G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपच्या दौऱ्यावर जात आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार आहेत.

नरेंद्र मोदी हे इटली भेटीदरम्यान व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटणार आहेत. शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी ही भेट होणार आहे.
 
G 20 परिषदेनंतर पंतप्रधान COP-26 या हवामान बदलासंबंधीच्या परिषदेत सहभागी होतील. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चादेखील होणार आहे.
 
विविध देशांच्या नेत्यांबरोबर होणाऱ्या चर्चेमध्ये इतर महत्त्वाच्या मुद्द्यांबरोबरच अफगाणिस्तानातील स्थिती संदर्भातील मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.