गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (17:37 IST)

प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण

priyanka gandhi

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे उपचारांसाठी त्यांना नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

हॉस्पिटलमधील व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर डी.एस.राणा यांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांना डेंग्यूमुळे ताप आला होता. मात्र योग्य ते उपचार घेतल्यानंतर आता त्यांची प्रकृती ठीक आहे. हॉस्पिटलमधील अधिका-यांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांना ताप आल्यानंतर 23 ऑगस्टच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वरिष्ठ डॉक्टर अरुप बसू यांच्या देखरेखीअंतर्गत प्रियंका गांधींवर उपचार प्रक्रीया सुरू होती. दरम्यान, आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.