सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (09:04 IST)

प्रियंका गांधींनी स्पष्ट केलं, प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी न झाल्याचं कारण

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस एकत्र येण्यात नेमका काय अडथळा ठरला यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं

"एकत्र न येण्यामागे अनेक कारणं होती. त्यात काही त्यांच्या बाजूनं होती, तर काही आमच्या बाजुनं होती. त्यामुळं चर्चेअंती काही मुद्द्यावर सहमती न झाल्यानं, एकत्र आलो नाही," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
 
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येण्याची दाट शक्यता होती, मात्र काही मुद्द्यामुळं ते होऊ शकलं नाही असंही त्या म्हणाल्या.
 
प्रशांत किशोर यांनी गेल्यावर्षी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी या सर्वांशी अनेकदा चर्चा केली. पण काँग्रेस प्रवेशावर निर्णय झाला नव्हता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोलही केला होती.