गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

शहीद जवानाच्या पत्नीच्या Love You शब्दांमुळे सर्वांचे डोळे डबडबले

पत्नीसमोर तिच्या पतीचे पार्थिव देह होते, ती वारंवार ताबुताला स्पर्श करत होती, वारंवार नवर्‍याला बघत होती. असा दृश्यामुळे सर्वांचं हृदय भरून आलं. तिथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाण्याने डबडबलेले होते.
 
मेजर विभूति शंकर ढौडियालसह निकिताच्या विवाहाला वर्ष देखील झालं नव्हतं, त्यांनी संसाराचे स्वप्न आता कुठे सुरू होत होते पण नियतीचा क्रूर काळ बघा की तिचा पती देशावर सर्वस्व त्याग करून  महाप्रयानासाठी निघाला होता.
 
ती आपल्या पतीच्या पार्थिव देहाला वारंवार स्पर्श करत होती. भारत माता की जय आणि शहीद मेजर ढौडियाल जिंदाबाद असे घोष होत असताना तिने पतीला I Love You म्हणत कॉफिनचे चुंबन घेतले आणि पुन्हा विरतापूर्वक त्यांना सॅल्यूट करत तीनदा जय हिंद म्हणत विदा केले. या दृश्याचे साक्षी स्वत:चे अश्रू लपवू शकले नाही.
 
जम्मू-काश्मिराच्या पुलवामामध्ये दहशतवादी चकमकीत शहीद मेजर ढौडियाल यांचे पार्थिव देह सोमवारी संध्याकाळी डेहराडून आणले गेले होते. शहीद मेजर यांचे पार्थिव देह मंगळवारी त्यांच्या निवास डंगवाल मार्गावर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी झाली होती. भरलेल्या गळ्याने लोकं भारत माता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे लावत होते.
 
आपल्या गर्भात मेजर विभूति यांची निशाणी सांभाळत असलेली निकिताची बहादुरी पाहून सर्व हैराण होते. स्वत:ला सांभाळत निकिताने स्वयं अंतिम प्रवासाचे नेतृत्व केले. त्यांनी म्हटले की आम्हाला सोडून गेले त्यांच्याकडून काही शिकावे, दुनियेत शहादत देणार्‍याकडून शिकायला हवं. देशात काम करण्यासाठी भरपूर क्षेत्र आहे, ईमानदारीने काम करा.