शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 6 फेब्रुवारी 2019 (09:29 IST)

पत्नी त्रस्त 54 पुरूषांची सहाय्यता कक्षात न्यायासाठी धाव

पती पिडीत महिला नेहमीच आपण ऐकतो आणि त्यावर पोलीस कारवाई सोबत कोर्टात अनेक केसेस आपण पाहत असतो, मात्र उस्मानाबाद येथे चक्क ५४ पत्नी पीडितांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. पतीसह सासरच्या मंडळींवर वेळोवेळी गुन्हे दाखल होत आले आहेत़ त्यात आता पत्नीच्या सततच्या कुरबुरीमुळे वैतागलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील 54 पुरूषांनी सामाजिक संस्थांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सहाय्यता कक्षात न्यायासाठी धाव घेतली असून, एकत्रित कुटुंबातून विभक्त राहणे, सतत संशय घेणे, मोबाईलमध्ये बिझी असणे, आदी कारणांनी आपण पत्नीमुळे त्रस्त झाल्याच्या तक्रारी पुरुषांनी केल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या महिला व मुलांकरिता सहाय्यता कक्षात वर्षभरात 33 पुरुषांनी अर्ज केले, वाशी तालुक्यातील ईट येथील डॉ. इक्बाल ग्रामविकास मंडळाच्या कक्षात 8 पत्नीपिडीतांनी तक्रारी केल्या आहेत. सोबतच कळंब येथील लोकप्रतिष्ठाण संस्था उस्मानाबाद संस्थेकडे 8 पत्नीपीडितांनी अर्ज दाखल केले आहेत. उमरगा येथील त्रिरत्न महिला बहुउद्देशिय संस्थेकडे 5 पुरुषांनी वर्षभरात तक्रारी केल्या आहेत़ असे समोर आले आहे. पिडीतानी तक्रार केल्या पत्नी सतत माहेरी जाते, सासू- सासऱ्यापासून विभक्त राहण्याचा तकादा लावते, सतत संशय घेते, पत्नीकडून चार चौघांत शिवगाळ करते, अपमान करणे आणि सोशलमिडीयाच्या दुनियेत नेहमीच बिझी रहात राहत फेसबुक, व्हॉट्सअप वापरत मोबाईलमध्ये तासन तास व्यस्त राहत आहे. त्यामुळे आता फक्त महिला अत्याचार नाही तर पुरुष अत्याचार याकडे देखील लक्ष दिले पाहिजे असे समोर येते आहे.