शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

पाकिस्तानात आता गायीच्या शेणाने चालेल बस

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक देश आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. तसेच पाकिस्तानदेखील एक विचित्र पर्याय शोधला आहे. आता हा देश गायीच्या शेणाने वाहने चालवण्याचा प्रयत्नात आहे. 
 
पाकिस्तानच्या कराची या शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी गायीचं शेण वापरण्याची योजना आहे. यासाठी सरकारने जिरो कार्बन उत्सर्जन असलेल्या 200 ग्रीन बस चालवण्याची योजना आखली आहे. या वाहनांच्या इंधनासाठी गायीच्या शेणाने तयार बायो मिथेन गॅस वापरली जाईल. यासाठी इंटरनॅशनल ग्रीन क्लाइमेट फंडची मदत घेतली जाईल. ही योजना 4 वर्षात पूर्ण होईल.
 
कराचीत चार लाख गाय आणि म्हशी सारखे दूध देणारे प्राणी आहे. प्रशासनाने आता यांच्या शेणाने गॅस तयार करून त्याचे इंधन रूपात वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानीय प्रशासन या जनावरांचं शेण गोळा करून त्या शेणाने बायो मिथेन तयार केली जाईल. ही गॅस वाहनांसाठी सप्लाय करण्यात येईल. अधिकार्‍यांप्रमाणे या योजनेमुळे दररोज 3,200 टन शेण आणि पशू मूत्र समुद्रात जाण्यापासून वाचेल. ज्याने समुद्रदेखील स्वच्छ राहील.
 
सध्या या शहरात शेण स्वच्छ करण्यासाठी दररोज 50 हजार गॅलन पाणी खर्च होतं. योजनेत यश मिळाल्यास पाकिस्तानच्या इतर शहरात देखील लागू केली जाईल. सूत्रांप्रमाणे हा 583 मिलियन डॉलरचा प्रोजेक्ट असून यासाठी ‘द ग्रीन क्लाइमेट फंड’ स्थानीय पाकिस्तानी प्रांत आणि एशियन डेवलपमेंट बँक प्रोजेक्टला धनराशी उपलब्ध करवून देणार आहे. बस कॉरिडॉर 30 किमी क्षेत्रात पसरलेले असणार या स्वच्छ यातायात पर्यायाचा सुमारे 15 लाख लोकांना फायदा मिळणार. या ईकोफ्रेंडली पर्यायद्वारे सुमारे तीन लाख लोकं दररोज प्रवास करतील.