शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (16:54 IST)

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का पाठविली गेली? मला देखील अटक करा

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पोस्टर्स चिकटविण्याच्या आणि त्यानंतर पोलिसांनी लोकांना अटक केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हल्लाबोल केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसी संदर्भात प्रश्न विचारला आहे. पोस्टरमध्ये लिहिलेल्या गोष्टी ट्विट करुन त्यांना अटक करण्याचे आव्हानही त्याने केले आहे. लक्षात असावे की यापूर्वी काही लोकांनी दिल्लीत पोस्टर पेस्ट केले होते, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींना असा प्रश्न पडला होता की मुलांची लस परदेशात का पाठविली गेली? या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बर्‍याच लोकांना अटक केली होती.
 
केरळमधील वायनाडचे खासदार आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काळ्या पार्श्वभूमीवर लिहिलेले एक पोस्टर ट्विट केले होते, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “मोदी जी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली ?” राहुल यांनी या ट्विटवर लिहिले की, मलाही अटक करा. राहुल गांधी दीर्घ काळापासून कोरोना व्हायरस आणि लसीवर केंद्र सरकारला लक्ष्य करीत आहेत.
 
एक दिवस अगोदर, राहुल गांधी म्हणाले होते की केंद्र सरकारच्या विनाशकारी लसीच्या धोरणामुळे विनाशकारी तिसऱ्या लाटेची खात्री होईल.  भारताला योग्य लस योजनेची आवश्यकता आहे. त्यांनी मीडियामध्ये आलेली  बातमी देखील पोस्ट केली होती ज्यात असा दावा केला गेला आहे की गंगेच्या काठावर 1,140 कि.मी. क्षेत्रात 2,000 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. कॉंग्रेस नेते म्हणाले, "जे म्हणायचे की  गंगा माँ ने बोलविले आहे ,त्यानेच आई गंगेला रडविले आहे ". यापूर्वी राहुल गांधींनी केंद्रीय व्हिस्टा प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. कॉंग्रेसच्या नेत्याने असे म्हटले होते की त्यांनी आपले गुलाबी चष्मा काढून टाकले पाहिजेत ज्यामधून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प व्यतिरिक्त काही दिसत नाही.