सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहुल रावण तर प्रियंका शूर्पणखा.. योगींच्या आमदाराची वायफळ टीका

प्रियंका गांधी यांची राजकारणात सक्रिय भागीदारीची बातमी कळल्यापासून भाजप नेत्यांची टीका सुरूच आहे. अमर्यादित वक्तव्य सुरू असताना यात उत्तर प्रदेश येथील बलियाहून भाजप आमदार सुरेन्द्र सिंह यांनी भर घातली आहे. सुरेन्द्र सिंह यांनी प्रियंका गांधींना शूर्पणखा तर राहुल गांधींची तुलना रावणाशी केली आहे.
 
प्रियंका यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर सुरेन्द्र सिंह यांनी उत्तर दिले की जेव्हा राम आणि रावणाचे युद्ध होणार होते तेव्हा रावणाने आधी आपल्या बहिणीला पाठवले होते. आता रामाच्या भूमिकेत मोदी असून राहुल रावण आहे. आणि शूर्पणखाच्या रूपात त्यांनी त्यांच्या बहीण म्हणजे की प्रियंका गांधीला पाठवले आहे, अर्थात लंका विजय निश्चित आहे असे समजून घ्या.
 
सुरेन्द्र सिंह यांनी म्हटले की भारताचे सौभाग्य आहे की मोदी सारखे नेते या भूमीवर जन्माला आले. 
 
उल्लेखनीय आहे की प्रियंका गांधी काँग्रेस महासचिव नियुक्त झाल्यावर त्यांना पूर्वी यूपीची जबाबदारी देण्यात आली आहे. तेव्हापासून भाजप नेते त्यांच्यावर टीका करत आहे.