तीन प्लेट बिर्याणी खाल्ली म्हणून नग्न केले
खाण्यापिण्याचा शौक मात्र खिसा रिकामा अशा लोकांसाठी शौक पूर्ण करणं किती महागात पडतं हे पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून कळून येतं. येथे बिर्याणी खाणे एका तरुणाला महाग पडलं.
एक तरुणाने पोटभर बिर्याणी खाऊन घेतली नंतर पैसे देण्याची वेळ आली तर खिशा रिकामा. यावर नाराज दुकानदाराने त्याचे कपडे काढवले आणि व्हिडिओ तयार केला.
हुगली जिल्हाच्या पंडुआ कालना रोड येथे जेव्हा एक तरुणाने एक दोन नाही तर तीन-तीन प्लेट बिर्याणी खाल्ल्यावर पैसे नसल्याचे सांगितले तर दुकानदाराने त्याला दुकान थांबवून घेतले. त्याने तरुणाचे कपडे काढवले आणि म्हटले की पैसे चुकवल्याविना येथून जाऊ देणार नाही.
210 रुपये चुकवण्यासाठी दुकानदाराने तरुणाला सायकल किंवा मोबाइल गहाण राखून पैसे घेऊन ये असे सांगितले परंतू त्याजवळ काहीच नसल्यामुळे कपडेच गहाण ठेवून घेतले. पैसे दे आणि कपडे घेऊन जा असे दुकानदाराने त्याला म्हटले. ही घटना मोबाइलमध्ये कॅप्चर झालेली असून आता व्हायरल होत आहे.
तरी, तेथील इतर दुकानदारांना या घटनेबद्दल कळल्यावर त्यांनी पैसे गोळा करून बिर्याणीचे पैसे चुकवले. नंतर दुकानदाराने त्याला कपडे परत केले.