शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

शंकरसिंह वाघेला यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले वाघेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शुक्रवारी शंकरसिंह वाघेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीआधी वाघेला यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते राष्ट्रवादीमध्ये आल्याने गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळण्याची शक्यता आहे. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.