बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अमृतसर , शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (08:06 IST)

अमृतसर घटना : रेलवेने म्हटले की ह्या घटनेसाठी प्रशासन जबाबदार

रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत ६१हून अधिक जण ठार, तर ७२ जण जखमी झाले. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या १००वर जाण्याची शक्यता आहे.
 
रावणदहन पाहाण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते. रावणदहनावेळी फटाके फुटू लागल्याने त्यापासून लोक दूर जाऊ लागले. त्यातील ३०० हून अधिक जण बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळांत जाऊन उभे राहिले. ते सारे जण हा सोहळा पाहाण्यात व त्याचे मोबाइलवर चित्रीकरण करण्यात इतके मश्गुल होते की, फटाक्यांच्या धूमधडाक्यात समोरून ट्रेन येत असल्याचे भानही त्यांना राहिले नाही. एकाच वेळी जालंधरहून अमृतसरकडे एक ट्रेन येत होती तर तेथूनच हावडा मेल जात होती. काही कळायच्या आतच ट्रेन अनेकांना चिरडून पुढे निघून गेली. ज्यांनी एका ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला, ते दुसºया ट्रेनखाली आले. थरकाप उडविणाºया या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यास तिथे हजर असलेल्यांपैकीच अनेक जण पुढे सरसावले. जखमींना जवळच्याच इस्पितळात दाखल करण्यात आले.
दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला व मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली. रेल्वे अधिकार्‍यांनी घटनास्थळी मदतकार्य सुरु केले. या मदतकार्यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल लक्ष ठेवून आहेत. अमेरिका दौºयातील सर्व कार्यक्रम रद्द करून पीयूष गोयल भारतात परत येत आहेत.