Marathi Biodata Maker
✕

CJP आंदोलन; दिल्लीत रेल्वे-मेट्रो-इंटरनेट बंद

Updated: शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 (11:27 IST)

दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विविध ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले असून, ४५ मेट्रो स्थानकेही बंद करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवरून ये-जा करणाऱ्या २०० हून अधिक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहे.   या ४५ गाड्यांमध्ये अनेक प्रीमियम, सुपरफास्ट, एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीहून ये-जा करणाऱ्या १७० पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.

तसेच कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी जनपथ-कर्तव्य पथ चौकाच्या चार किलोमीटरच्या परिसरात २४ तासांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. ही बंदी ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत लागू राहील. दरम्यान, दिल्ली मेट्रोच्या ५७ स्थानकांचे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे बंद ठेवण्यात येतील आणि ६० हून अधिक गाड्या रद्द केल्या जातील.
ALSO READ: सीजेपीच्या आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके म्हणाले, "सरकार जनतेला घाबरते, पण तरुण घाबरत नाही
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) तैनाती वाढवण्यात आली आहे. मेट्रो स्थानके बंद करणे आणि गाड्या रद्द करणे यांसारख्या निर्बंधांची आवश्यकता आणि प्रमाणबद्धतेवर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोबाइल इंटरनेट सेवांच्या निलंबनाचा दिल्लीतील अनेक प्रमुख भागांवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये कनॉट प्लेस, मंडी हाऊस, प्रगती मैदान, गुरुद्वारा बंगला साहिब, बाराखंबा रोड, खान मार्केट, लोधी रोड आणि जांगपुराचा काही किंवा संपूर्ण भाग यांचा समावेश आहे. या निर्बंधांमुळे या भागांतील रहिवासी, व्यावसायिक आणि अभ्यागतांना मोबाइल इंटरनेट वापरताना अडचणी येऊ शकतात.
ALSO READ: दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले; आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झाले होते

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments