1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राम रहीमचा पॅरोल फेटाळला

Ram Rahim's parole was rejected
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरणी सध्या तुरुंगात आहे. राम राहीमच्या पत्नीने पॅरोल अर्ज हायकोर्टात दाखल केला होता. पॅरोलसाठी केलेला अर्ज पंजाब व हरियाणा हायकोर्टाने फेटाळला आहे. त्यावर सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने दणका देत पॅरोल फेटाळून लावला आहे.
 
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमलाबलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ऑगस्ट 2018 मध्ये सुनावण्यात आली होती. न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. 2002 मध्ये हे बलात्कार प्रकरण उजेडात आले होते.