बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (08:19 IST)

वाचा, अनोख्या आणि विचित्र लग्नाची गोष्ट

उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजच्या अनोख्या आणि विचित्र लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा सुरु असून या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. कारण मनकवार गावात एका तरुणाच चक्क लाकड्या बाहुलीसोबत लग्न पार पडले. या तरुणांने आपल्या आई –वडिलांच्या शेवटच्या इच्छेसाठी हे पाऊल उचले. वयाच्या ९० व्या वर्षी शिवमोहन यांना ९ मुले आहेत. त्यांची सर्वांची लग्न झाली होती. फक्त सर्वात लहान पंचराज या मुलाचे अद्याप लग्न झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून त्याचे लग्न जमवण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करत होते. मात्र, काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. दरम्यान, पंचराज याचे लग्न पाहण्याची शिवमोहन यांची अखेरची इच्छा आहे, असे ते म्हणाले. आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला मोठ्या व्यक्तींनी एक पर्याय शोधला.
 
त्यानुसार पंचराज याला लाकडीच्या बाहुलीशी लग्न करायचे सुचवले. सर्वप्रथम पंचराज लग्न करण्यासाठी तयार नव्हता. मात्र, वडिलांच्या अखेरच्या इच्छेसाठी तोही लग्नासाठी तयार झाला. त्याप्रमाणे लाकडी बाहुलीसोबतच्या लग्नासाठी रितसर मुहुर्त काढण्यात आला. गावकरी, पाहुणे आदिंना आमंत्रणं पाठवण्यात आले आणि १८ जून रोजी सोशल डिस्टन्सिंग पाळत हा अनोखा विवाह सोहळा अखेर पार पडला.