1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (12:38 IST)

'या' जिल्ह्यांत वादळी पाऊस

IMD Alert On Rain:भारतीय हवामान खात्याने सांगितले की  16 मे नंतर दिल्ली आणि परिसरात पाऊस पडण्याची शक्यता असून उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळू शकतो.  तसेच उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये भीषण उष्णतेचा कहर सुरूच आहे. राजस्थान आणि विदर्भात या महिन्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. 
 
या भागात उष्णतेची तीव्र लाट आहे
वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले की, पश्चिम राजस्थान आणि विदर्भातील सुमारे 7-8 स्थानकांवर तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस राहते. उष्णतेची लाट कायम असून ती पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार आहे. याशिवाय पश्चिम मध्य प्रदेशात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते.