1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. result of 12 cbse

सीबीएससी १२ चा आज निकाल, पहा 'या' वेबसाईटवर

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएससी) बोर्डाचा बारावीचा निकाल आज अर्थात शनिवारी जाहीर होणार आहे.  शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी बारावीची परीक्षा सीबीएसई द्वारे ५ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे १२ लाख विद्यार्थींनी नोंदणी केली होती. देशातील सुमारे ४ हजार १३८ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. 
 
सीबीएससीचा बारावीचा निकाल case.nic.in या सीबीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळासह results.gov.in , तसेच cnseresults.nic.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येऊ शकतो. त्याचबरोबर case.examresults.net या संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. 
पुढील लेख
वाचा, असे आहे देशात सेक्स करण्याचे प्रमाण