सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (09:23 IST)

रॉबर्ट वधेरा यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Robert Vadhera
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वधेरा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. रॉबर्ट वधेरा यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय मनोज अरोरा यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
रॉबर्ट वढेरा आणि मनोज अरोरा यांच्यावतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. विशेष न्यायालयाने पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ईडीला धक्का बसला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर वढेरा यांनी समाधान व्यक्त केले.
 
रॉबर्ट वधेरा लंडनमध्ये बेहिशेबी मालमत्तेवरून न्यायालयीन कचाट्यात सापडले आहेत.  त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. वधेरा यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी सुरू आहे.