शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नोकरीतून काढले तर तरुणाने कंपनीच्या एचआर हेडला गोळी मारली

Japanese company
गुरूग्राम- नोकरीतून बाहेर काढल्यामुळे संतापलेल्या एका तरुणाने आपल्या एकाच्या मदतीने येथील जपानी कंपनी मित्सुबा च्या मानव संसाधन (एचआर) विभाग प्रमुखाला गोळी मारून जखमी केले. पोलिसांनी दोन प्रमुख आरोपींना अटक केली आहे.
 
पोलिसांप्रमाणे ही घटना सकाळी नऊ वाजता घडली जेव्हा एचआर प्रमुख दिनेश शर्मा कारने आपल्या आयएमटी मानेसर स्थित ऑफिसात जात होते.
 
माहितीप्रमाणे एका बाइकवर स्वार दोन लोकांनी बंदूक दाखवून शर्मा यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. ते थांबले नाही तर हत्येच्या उद्देश्याने त्यांच्यावर गोळी चालवली. शर्मा यांना दोन गोळ्या लागल्या आहेत.
 
हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले. लोकांनी पोलिसांना सूचित करून शर्मा यांना रुग्णालयात भरती केले.