बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

म्हणे, रामायण काळात टेस्ट ट्यूब बेबी प्रकार होता

त्रिपुरा येथील मुख्यमंत्री विप्लब देव यांच्या मताशी सहमती दर्शवताना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी आता नवा शोध लावला आहे. सीतेचा जन्म धरणीतून झाला, असे सांगितले जाते. याचाच अर्थ असा की रामायणाच्या काळातही टेस्ट ट्यूब बेबी हा प्रकार अस्तित्वात असावा, असे शर्मा यांनी म्हटले आहे.दिनेश शर्मा यांनी एका कार्यक्रमात संबोधित केले. 
 
ते म्हणाले, पत्रकारिता ही महाभारताच्या काळातही असेल. महाभारतात जे युद्ध झाले ते संजयने धृतराष्ट्राला सांगितले. हे प्रकारचे ‘लाईव्ह टेलिकास्ट’च होते. यावरच ते थांबले नाही. त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी हे तंत्रज्ञान रामायमाच्या काळातही असावे, असा दावा केला. सीतेचा जन्म धरणीतून झाला, असे सांगितले जाते. याचाच अर्थ असा की रामायणाच्या काळातही टेस्ट ट्यूब बेबी हा प्रकार अस्तित्वात असावा, असे मत त्यांनी मांडले.