मंगळवार, 29 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (15:26 IST)

शीख धार्मिक चिन्हे असलेले महिलांचे अंतर्वस्त्र विकणार्‍या दुकानदाराला अटक

Delhi News राजधानी दिल्लीत शीख धर्मिक चिन्ह छापील महिलांचे अंडरगारमेंट्स विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत खळबळ उडाली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणारे हे प्रकरण दिल्लीतील गांधीनगर मार्केटचे आहे. अशा अंडरगारमेंट्स विकणाऱ्या दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
 
सोशल मीडिया यूजर्सद्वारे याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. हे धक्कादायक आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले जात आहे. धार्मिक भावना दुखावणारे हे प्रकरण असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
व्हिडिओत एक महिला म्हटत आहे की उत्पाद विकला जात असताना काय मार्केटमध्ये येणार्‍या- जाणार्‍यांनी हे बघितले नसेल. मार्केटमध्ये अजून शॉप्स आहेत काय त्यांनी यावर लक्ष दिले नाहीत. आम्हाला तर हे देखील माहित नाही हे कधीपासून विकले जात आहे आणि देशात याचे उत्पादन कुठे होत आहे. त्यांनी शासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ही धर्माधारित बाब आहे आणि ती कोणत्याही व्यक्तीशी संबंधित नाही.
 
लोकांनी दुकानदाराचा निषेध केला आहे. यावर लोकांनी नाराजी व्यक्त करत असे प्रॉडक्ट्स कसे विकता येईल, असा सवाल केला. याला विरोध करणाऱ्या लोकांशी दुकानदाराने गैरवर्तन केल्याचे बोलले जात आहे. याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेथे पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी आंदोलकांना कारवाईचे आश्वासन दिले आहे.