शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (19:34 IST)

एक्झिट पोल: मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणाचा कौल कोणाला?

Exit polls
BBC
Exit polls मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांसाठीचं मतदान पूर्ण झालं असून 3 डिसेंबरला या पाचही राज्यांचा निकाल हाती येईल.
 
मात्र, त्याआधी कोणत्या राज्यात कोणाची सरशी होणार, कोण सत्ता टिकवणार तर कुठे सत्तापालट होणार याचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल प्रसिद्ध होत आहेत.
 
वेगवेगळ्या माध्यमसंस्था आणि एजन्सींनी केलेल्या या एक्झिट पोलमधून पाच राज्यांचं सत्ताकारणाचं चित्र काय असेल याचा आपणही आढावा घेऊया.
 
छत्तीसगढ
छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. इथे 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान झालं होतं.
 
इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला छत्तीसगढमध्ये 40 ते 50 जागा जिंकता येतील, तर भाजप 36 ते 46 जागांवर विजय मिळवू शकेल.
एबीपी आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार छत्तीसगढमध्ये काँग्रेसला 57, तर भाजपला 33 जागा मिळतील.
रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेमध्ये छत्तीसगढमध्ये 44-52 जागा काँग्रेस जिंकू शकेल, तर भाजप 33 ते 42 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
टाइम्स नाऊने आपल्या एक्झिट पोलमध्ये 48-56 जागांवर काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे, तर 32 ते 40 जागांवर भाजपच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे.
न्यूज24- चाणक्यचा एक्झिट पोल काँग्रेसला 57 जागा देत आहे, तर 33 जागा भाजपाला मिळतील असा अंदाज आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेससाठी छत्तीसगढचा विजय हा तितका सोपा नसल्याचं चित्र या आकड्यांतून स्पष्ट होत आहे.
 
एकूणच या सर्व्हेनुसार छत्तीसगढमध्ये दोन्ही पक्षांत चुरशीची लढत असेल.
Exit polls
BBC
राजस्थान
राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागा आहेत. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला इथे 86 ते 106 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
 
2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 जागा मिळाल्या होत्या. अशोक गहलोत हे मुख्यमंत्री झाले होते, तर भाजपला 70 जागांवर विजय मिळाला होता.
 
भाजपला राजस्थानमध्ये 80 ते 100 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 9-18 जागांवर अन्य पक्ष, अपक्ष विजयी होऊ शकतात.
राजस्थानमध्ये टाइम्स नाऊच्या पोलनुसार काँग्रेसला 56 ते 72 जागा मिळतील, तर भाजपला 108 ते 128 जागा मिळतील.