1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (12:44 IST)

धक्कादायक: बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

Shocking: 5 members of the same family commit suicide in Bangalore National Marathi News In Marathi Webdunia Marathi
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.बेंगळुरूच्या बयादरहल्ली भागात एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले आहेत. यातील चार जणांनी गळफास घेतला आहे , तर नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पलंगावर पडलेले आढळले. प्राथमिक तपासामध्ये हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. 
 
एक अडीच वर्षांची मुलगी पाच मृतदेहांसह घरात पाच दिवसांपासून राहत होती, ती जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांनी सांगितले आहे की लोक कसे मरण पावले, हे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच कळेल.
 
सिंचना - वय 34 वर्षे,भारती - वय 51 वर्षे,सिंधुराणी - वय 31 वर्षे,मधुसागर - वय 25 वर्षे आणि 9 महिन्याचे बाळ असे मृत्युमुखी झालेल्याची माहिती आहे. 
 
मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
पोलिसांना ती मुलगी त्याच खोलीत सापडली जिथे मधुसागरने गळफास घेतले.सध्या मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला उपचार आणि समुपदेशनाची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) म्हणाले की, आम्हाला घरातून कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. घरातील वडीलधारी शंकर यांना धक्का बसला आहे. शंकरने सांगितले आहे की त्यांच्या मुली त्यांच्या पतींशी भांडण करून घरी आल्या. या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी आणि त्यांना त्यांच्या पतींकडे परत पाठवण्याऐवजी, त्यांची पत्नी भारती यांनी त्यांना इथेच राहण्यास प्रोत्साहित केले.
 
कुटुंबात भांडणे चालू होती
 
शंकर म्हणाले, "मी माझ्या मुली सिंचाना आणि सिंधुराणी यांना शिक्षित करण्यासाठी खूप मेहनत केली. मुलगा मधुसागर हा सुद्धा इंजिनीअरिंग पदवीधर होता आणि एका खाजगी कंपनीत काम करत होता. सिंचनाचे आपल्या पतीसोबत भांडण झाली नंतर ती इथे परत आली.आर्थिक बाबतीत कोणतीही समस्या नव्हती.तिने क्षुल्लक कारणामुळे हे घातक पाऊल उचलले. "
 
पोलिसांनी सांगितले की, शेजाऱ्यांनी त्यांना घरात भांडण झाल्याची माहिती दिली,नंतर मधुसागर तडकाफडकीने घरातून रागावून बाहेर निघून गेला. या कुटुंबाने रविवारीच आत्महत्या केली. पोलिसांच्या सांगण्यानुसार हे सर्व सदस्य पाच दिवसांपूर्वीच मरण पावले आहेत.