शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (23:10 IST)

धक्कादायक! आर्ची-परशासारखे दोघांना संपवलं, लग्नानंतर तीन दिवसांनी प्रेमी युगुलाची हत्या

murder
तामिळनाडूतील एका जोडप्याला प्रेमकरणे खूप  महागात पडले. या जोडप्याने पळून जाऊन घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. त्यानंतर या जोडप्याचा आनंद कोणीतरी हिरावून घेतला आणि तीन दिवसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केली.
 
हे संपूर्ण प्रकरण तामिळनाडूच्या थुथुकुडी येथील मुरुगेसन भागातील आहे. जिथे भरदिवसा घरात घुसून एका जोडप्याची हत्या करण्यात आली. मुरुगेसने येथील रहिवासी 24 वर्षीय मारी सेल्वम आणि थिरू व्ही नागा येथील रहिवासी 20 वर्षीय कार्तिक हे गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंधात  होते. अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी दोघांनीही घरच्यांविरोधात पळून जाऊन लग्न केले आणि मुरुगेसन नगरमध्ये एकत्र राहू लागले. 
 
दोघेही कुटुंबापासून वेगळे राहू लागले. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक पाच अज्ञात जण  त्याच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना घटनास्थळी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आरोपी दोन दुचाकीवरून आले होते. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
 
Edited by - Priya Dixit