1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आईची चिता पाहून मुलाचाही मृत्यू

Son also died after cremation on his mother
विधीलिखत असल्यास कोणीचाही काहीही चालत नाही. अशीच परिस्थिती चोपन सोन नदी घाटावर घडली जेव्हा आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मुलाचाही मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने लोक हादरून गेले.
 
व्हीआयपी रोड, ओब्रा नगर येथे राहणारे राजेश कुमार गुप्ता (45) यांच्या आई हिरामणी देवी (80) यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वजण चोपन सोन नदी घाटावर गेले. आईला अग्नी दिल्यानंतर राजेश काही अंतरावर जाऊन बसला. याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. सोबतच्या लोकांनी त्याला तात्काळ चोपण सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
 
काही महिन्यांपूर्वीच त्यांचे वडील हनुमान प्रसाद यांचे निधन झाले होते. आता एकाच दिवशी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने लोकांना धक्का बसला आहे. दुसरीकडे रुग्णालयाकडून मेमो मिळाल्यानंतर पोलिसांनी आगाऊ कारवाई सुरू केली आहे.
photo:symbolic