शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मिरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे.

सोपोरमध्ये बुधवारी सकाळी दडून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसंच त्यांच्याकडून शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.  गुलजार अहमद आणि बासित अशी या दोन दहशतवाद्यांची नावं असून ते दोघे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे आहेत.