शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (10:31 IST)

विचित्र अपघात, एकाच मृत्यू, चार जखमी

Strange accident
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी ब्रिजवर भाजीचा ट्रक, दोन कार आणि दुचाकीचा विचित्र अपघात झाला आहे. यात एकाच मृत्यू आणि चार जखमी झाले आहेत. शनिवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
 
जोगेश्वरी ब्रिजवर भाजीचा ट्रक, दोन कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. मृताचे नाव अद्याप समजू शकले नाही. याचबरोबर या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती.