शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (10:48 IST)

Earthquake: लडाखमध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का, रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रता

earthquake
Earthquake:लडाखमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने ट्विटरवर पोस्ट केले की लडाख आणि लेहमध्ये पहाटे 4.33 वाजता 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू पाच किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
तज्ज्ञ म्हणतात ,हिमालय पर्वतरांगातील टेक्टोनिक प्लेट अस्थिर झाली आहे. त्यामुळे असे भूकंप दीर्घकाळ होत राहतील. यावेळी भूकंप होण्यामागे हेही एक प्रमुख कारण आहे. हे धक्के हिमालय पर्वतरांगांवर येतात. जम्मू आणि काश्मीर, लडाख, नेपाळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या भूकंपाचा प्रभाव कधी कधी दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या राज्यांमध्येही दिसून येतो.म्हणून वारंवार भूकंप येत आहे. 
 
रिश्टर स्केल वापरून भूकंप मोजले जातात. त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाचे मोजमाप त्याच्या केंद्रस्थानावरून केले जाते. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता त्यावरून मोजली जाते. ही तीव्रता भूकंपाची तीव्रता ठरवते
 
Edited By- Priya DIxit