सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुन्हा एकदा मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका वृद्ध महिलेने केला आहे.  सखुबाई विठ्ठल झाल्टे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. 

मात्र, पोलिसांनी तात्काळ सदर महिलेला सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल केलं आहे.  या महिलेने पत्र लिहून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात किंवा मंत्रालय परिसरात आत्महत्येचे वेगवेगळे प्रयत्न झाल्याचे बघायला मिळाले.