ऐतिहासिक निर्णय, युद्धजन्य क्षेत्र सोडून सर्व क्षेत्रात महिलांना समान अधिकार

women-army
Last Modified मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (09:42 IST)
भारतीय सैन्यदलात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने
कायम ठेवले आहे. युद्धजन्य क्षेत्र सोडून सर्व क्षेत्रात महिलांना समान अधिकार देण्यासाठी केंद्र सरकार बाध्य असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. २०१० साली दिल्ली हायकोर्टाने लष्करातील सर्व महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्याचा आदेश दिला होता. त्याला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. भारतीय लष्कर हे पुर्णपणे पुरुषांचे असून ते महिला अधिकाऱ्यांना स्वीकारणार नाहीत, असा युक्तीवाद केंद्र सरकारने केला होता.
सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, “दिल्ली हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर खरंतर केंद्राने महिलांना स्थायी कमिशन द्यायला हवे होते. आठ विभागात महिलांना स्थायी कमिशन देण्याचे आदेश केंद्राने २०१९ मध्ये काढले होते. स्थायी कमिशन देण्यासाठी महिलांचे शारिरीक वैशिष्टे ही बाधा ठरू शकत नाही.” तसेच महिलांच्या क्षमता आणि कर्तृत्वावर शंका घेऊन फक्त महिलांचाच नाही तर संपुर्ण लष्काराचा अवमान होत असल्याचेही निरीक्षण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने व्यक्त केले.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. तसेच सुनावणी दरम्यान केंद्र सरकारचे कान देखील उपटले आहेत. लष्करात समानता आणतानाच महिलांना शारीरिक मर्यादा आणि आई होणे, कुटुंबाची जबाबदारी अशा सामाजिक कारणांमुळे महिलांना समान संधी नाकारता येणार नाही. हे संविधानाच्या सर्वांना समान संधी या तत्त्वच्या विरोधात असल्याचेही सुप्रीम कोर्टाने सुनावले. तीन महिन्यात केंद्र सरकारने महिलांना कायमस्वरुपी कमिशन देण्यासाठी कमिशन स्थापन करावे, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

योगींवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक

योगींवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या एका ...

मान्सूनच्या वाटेत ‘अम्फान'चा अडथळा : आगमन लांबण्याची शक्यता

मान्सूनच्या वाटेत ‘अम्फान'चा अडथळा : आगमन लांबण्याची शक्यता
1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, आता मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार ...

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी ७ ...

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी ७ वाजता देशातल्या कम्युनिटी रेडिओंशी संवाद साधणार
हिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी ७ वाजता देशातल्या कम्युनिटी रेडिओंशी ...

अयोध्येत खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले

अयोध्येत खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले
अयोध्येत राम मंदिराचे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमार्फत काम सुरू असताना काही ...

पाकिस्तानहून सीआरपीएफच्या महिला जवानला फोन आला, माहिती द्या ...

पाकिस्तानहून सीआरपीएफच्या महिला जवानला फोन आला, माहिती द्या आणि जेवढी हवी तेवढी किंमत घ्या
पाकिस्तानमधील एका व्यक्तीने सीआरपीएफच्या महिला शिपायाला व्हॉट्सअॅप कॉल केला आहे. प्रथम ...