बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (09:44 IST)

नोटाबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

suprime court
सुप्रीम कोर्टाने तूर्त नोटाबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. देशातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगत कोर्टाने सुनावणी 2 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. नोटाबंदीच्या विरोधात देशभरातील न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या वेगवेगळ्या हायकोर्टांमध्ये याचिकांना एकाच हायकोर्टात ट्रान्सफर करण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. मात्र वेगवेगळ्या याचिकांमध्ये उपस्थित केले गेलेले मुद्दे वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे  नोटाबंदीविरोधात विरोधकांनी देशव्यापी ‘आक्रोश’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 नोव्हेंबरला सर्वपक्षीय एकत्रितपणे देशव्यापी आंदोलन करणार आहेत अशी माहिती माकप नेते सिताराम येचुरी यांनी दिली आहे.