शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सर्जिकल स्ट्राइकवर कोणत्याही देशाला शंका नाही : पंतप्रधान

''दहशतवादाला प्रत्युत्तर देताना जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला त्यावेळी जगाला आमची ताकद काय आहे याची जाणीव झाली.  आमच्या सर्जिकल स्ट्राइकवर कोणत्याही देशाने शंका उपस्थित केली नाही'' हे सांगतानाच त्यांनी पुढे पाकिस्तानला चिमटा काढला. अर्थात ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असं मोदी पाकिस्तानचं नाव न घेता म्हणाले.

अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्जिनिया येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला.