बाप्पाला फुटला घाम, मूर्तीला लावला चंदनाचा लेप
देशभरात उकडत असल्यामुळे सर्व परेशान आहे. जून महिना सुरु झाला तरी उष्णतेच्या लाटा कमी होत नसल्यामुळे नागरिक हैराण होत आहे. अशात गणपती बाप्पाला देखील घाम फुटतोय म्हटल्यावर चमत्कार घडल्याचा दावा होत आहे.
बिहारच्या गया जिल्ह्यातील रामशीला डोंगरावरील मंदिरातील गणपतीच्या मूर्तीला घाम फुटण्याची घटना समोर येत आहे. उकडत असल्यामुळे त्याचा त्रास देवालाही जाणवत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. म्हणून देवाला चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. मूर्तीजवळ पंखे देखील लावण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर गणपतीचे वस्त्र देखील त्याहिशोबाने तयार केले जात आहे.
परंतू वैज्ञानिक कारण बघितले तर या मंदिरातील मूर्ती मुंगा दगड कोरुन तयार करण्यात आलेली आहे. तसेच या दगडाची प्रकृती उष्ण असून अधिक उकडल्यास दगडातून पाणी बाहेर पाझरणे सामान्य बाब आहे.
गयाचे हे मंदिर पिंडदानासाठी प्रसिद्ध आहे. श्रीराम पिंडदानासाठी या मंदिरात आल्याचे सांगितलं जातं.