बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑगस्ट 2023 (17:29 IST)

तेलंगणा:महाविद्यालयीन कार्यक्रमात नाचताना विद्यार्थिनीचा कोसळून मृत्यू

करीमनगर: गंगाधर मंडळाच्या न्यालकोंडापल्ली गावात तेलंगणा स्टेट मॉडेल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टीमध्ये नाचणारी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा हृदय च्या विकारामुळे मृत्यू झाला.जी प्रदीप्ती असे तिचे नाव आहे. ती शुक्रवारी बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला. ती कोसळेपर्यंत आनंदाने नाचत होती, विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शिक्षक आणि इतरही हादरूनगेले.

त्यांनी तिच्याकडे जाऊन सीपीआर केले, मात्र विद्यार्थाने कोणताही  प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला  करीमनगर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवले, मात्र वाटेतच तिच्या  मृत्यू झाला. ती गंगाधरा मंडलातील व्यंकटयपल्ली गावातील मूळ रहिवासी होती. गेल्या काही महिन्यांपासून ती कोणत्यातरी आजाराने त्रस्त होती आणि तिच्या प्रकृतीची काळजी घेतली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. फ्रेशर्स डेला हजेरी लावणारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक त्याला समोर कोसळून मरण पावल्याचे पाहून बराच वेळ हादरून गेले होते.
 


Edited by - Priya Dixit