मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:23 IST)

सुरतमध्ये भीषण अपघात, केमिकल टँकरमधून गळती होऊन 6 जणांचा मृत्यू

गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. सुरत येथे सचिन जीआयडीसी परिसरात केमिकल टँकरमधून गळती झाली. या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जणांवर उपचार सुरू आहेत. विषारी रसायनाच्या संपर्कात आल्यामुळे 25 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. सर्व बाधितांवर सुरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, जीआयडीसीतील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक 362 च्या बाहेर 10 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरपासून 10 मीटर अंतरावर मजूर झोपले होते, त्यांना या विषारी रसायनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या 20 हून अधिक जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. टँकरमधून रसायन टाकले जात असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. सध्या ८ जण व्हेंटिलेटरवर आहेत.