बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (23:34 IST)

दक्षिण काश्मीर येथे पुलवामात चकमकीत 3 दहशतवादी ठार

श्रीनगरतील दक्षिण काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांच्या खात्मा केला. 
दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने जिल्ह्यातील चादंगाम गावात घेराबंदी करत शोध मोहीम सुरु केली. दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही गोळीबार केला.
काश्मीर रेंजच्या आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले तीनही दहशतवादी जैश ए मोहम्मदचे होते. त्यांच्या ताब्यातून  दोन अमेरिकन M4 स्नायपर रायफल ही जप्त करण्यात आले आहे.