शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 ऑक्टोबर 2025 (10:16 IST)

ट्रेलर-स्कॉर्पिओची भीषण टक्कर, चार जणांचा जळून मृत्यू

Accident, Kollam Accident, KSRTC bus accident in Kollam, അപകടം, കെഎസ്ആര്‍ടിസി ബസ് അപകടം, കൊല്ലത്ത് ബസ് അപകടം
राजस्थानच्या बारमेरमधील गुडामलानी येथे गुरुवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. ही घटना बालोत्रा-सिंधारी मेगा हायवेवर घडली. ट्रेलर आणि स्कॉर्पिओची टक्कर झाली. त्यानंतर दोन्ही वाहनांना मोठी आग लागली. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की त्यातील लोकही बाहेर पडू शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील हा सलग तिसरा रस्ता अपघात आहे. यापूर्वी जैसलमेरमध्ये एका बसला आग लागली होती. गुडामलानीच्या दाबाड गावातील पाच मित्र स्कॉर्पिओमधून प्रवास करत होते. ते सिंधरी येथे आले होते. ते तिथे एका हॉटेलमध्ये जेवण करून रात्री उशिरा परतत होते. त्यावेळी सदा सीमावर्ती भागात एका ट्रेलरने गाडीला धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली आणि त्यांना आग लागली.
सूत्रांनुसार, पोलिसांनी जळालेल्या चार मित्रांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. एसपी रमेश आणि जिल्हाधिकारी सुशील कुमार यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह रुग्णालयात दाखल केले आहे. पाचव्या तरुणावर उपचार सुरू आहे. हा अपघात गावापासून ३० किलोमीटर अंतरावर घडला.
Edited By- Dhanashri Naik