बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (16:42 IST)

हवामान विभागाचा अंदाज, थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

हवामान विभागाने डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यानचा तापमानाचा अंदाज जाहीर केला आहे. यात यंदा देशभरात किमान तापमान बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे़ उत्तर भारतातील थंड हवामानाच्या परिसरात यंदा किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ०़५ ते -०़५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
 
दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान बहुतांश भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ०़५ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे़ जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल, उत्तराखंड, छत्तीसगड या हवामान विभागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ०़५ ते -०़५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे़
 
थंड प्रदेशातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३९ टक्के इतकी आहे़ त्यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर, हरियाना, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्याचा त्यात समावेश आहे.