बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (16:25 IST)

दंगलीबद्दल माहिती असेल, तर पोलिसांना कळवा : संजय राऊत

राम मंदिराच्या मुद्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखला जात असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. ते काल विक्रोळी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या दाव्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली गेली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दंगलीबद्दल माहिती असेल, तर पोलिसांना कळवा असा टोला लगावला आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या मुद्यावर बरीच चर्चा रंगली आहे. राम मंदिर बांधले जावे यासाठी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे स्वत: अयोध्येचा दौरा करुन आले. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.