रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (07:38 IST)

देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटांत माफ करतात पण शेतक-याला कर्जमाफी देत नाहीत

भाजपाचे सरकार जनतेमध्ये द्वेष, हिंसा,भीती पसरवत असून त्याच्या  विरोधात ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भाजप व आरएसएस देशभरात  भीतीचे वातावरण बनवत आहेत. जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. शेतकरी पहाटे ४ वाजता कामाला सुरुवात करतो, घाम गाळतो पण शेतमालाला भाव मिळत नाहीत. पीकविम्यासाठी खाजगी कंपन्यांना हप्ता भरतात. चक्रीवादळ, पाऊस, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते पण नुकसाई भरपाई मिळत नाही. मोदी सरकार देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटांत माफ करतात पण शेतक-याला कर्जमाफी देत नाहीत, असा घणाघाती हल्लाबोल खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.
 
हिंगोली जिल्ह्यातील काळेगाव येथे पदयात्रेची चौक सभेत हजारो लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा, आरएसएस, मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते म्हणाले की, भाजपच्या राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती कमी होत नाहीत. यातून मिळालेला पैसा दोन चार उद्योगपतींच्या खिशात जातो. छोटे व्यापारी यांचे नुकसान  झाले, हा व्यवसायच बंद करून दोन चार उद्योगपतींची एकाधिकारशाही आणण्याचा मोदींचा मनसुबा आहे. हे सरकार 'हम दो हमारे दो' चे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हणताच जनतेतून याला प्रतिसाद देत, 'दो सरकार में, दो बाजार में', असा आवाज उमटला.
Edited by : Ratnadeep Ranshoor