शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2022 (19:34 IST)

Electricity Bill:3,419 कोटींचे वीज बिल पाहून व्यक्ती पोहोचला हॉस्पिटल

electric bill
Bill Of More Than 3 Crores Rupees: हे प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हे घर प्रियांका गुप्ताच्या नावावर रजिस्टर्ड आहे. ही महिला गृहिणी असून तिचा पती संजीव कांकणे वकील आहे. संजीवच्या म्हणण्यानुसार, वीज बिल पाहून त्यांच्या पत्नीचा रक्तदाब खूप वाढला. हृदयरोगी असलेल्या त्यांच्या सासऱ्यांना जबर धक्का बसला आणि त्यांना रुग्णालयात न्यावे लागले. मात्र, विभागाने आपली चूक मानून मूळ बिल पाठवले आहे. 
मूळ बिल सुमारे एक हजार रुपये होते
या संपूर्ण प्रकरणाची माहिती विद्युत विभागाला मिळताच विभागाने बिलात सुधारणा करून मूळ बिल ग्राहकांना पाठवले. मूळ बिल 1,300 रुपये होते. विभागाच्या चुकीमुळे या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला. तुम्ही पण बघा त्याच्या बिलाचा फोटो (व्हायरल फोटो)...
 
विभागाने माफी मागितली
वीज विभागानेही या चुकीबद्दल माफी मागणारे निवेदन जारी केले आहे. ही मानवी चूक असल्याचे विद्युत विभागाने म्हटले असून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. सहायक महसूल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.