शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (15:11 IST)

30 हजाराची लाच घेणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी रंगेहाथ पकडले

Bribe
30 हजार रुपयांची लाच घेणा-या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळ्यात अडकले आहे. अहमदनगर येथील गोल्ड काऊन्सलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉल मार्किंग सेंटरचा कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात ही लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत संशयित प्रवीण मनोहर जोशी (५७, धंदा- नौकरी,प्रादेशिक अधिकारी ,वर्ग – १ नेमणूक – प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद,अति पदभार प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक रा – औरंगाबाद), कुशल मगननाथ औचरमल (४२, पद क्षेत्र अधिकारी वर्ग – २ नेमणूक प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक) यांच्यावर कारवाई केली. प्रत्येकी १५ हजार असे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली असता पंचांसमक्ष लाच स्वीकारताना दोघा संशयितांना रंगेहाथ पकडण्यात आले.
 
 *युनिट -* नाशिक *तक्रारदार-* पुरुष वय- ४७,रा.अहमदनगर जि.अहमदनगर **आरोपी* =१).प्रवीण मनोहर जोशी , वय ५७, धंदा- नौकरी,प्रादेशिक अधिकारी ,वर्ग- १, नेमणूक- प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद , अति पदभार :-प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक रा- औरंगाबाद२)कुशल मगननाथ औचरमल वय :-४२.पद.:-क्षेत्र अधिकारी वर्ग :-२, नेम .:-प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक *लाचेची मागणी-*प्रत्येकी 15000/-₹ एकूण 30000/-रु *लाच स्वीकारली *प्रत्येकी 15000/₹ एकूण 30000/-रु *हस्तगत रक्कम-* 30000/-रु *लाचेची मागणी -* ता.28/06/2022 *लाच स्विकारली* -ता. 28/06/2022 *लाचेचे कारण* -.यातील तक्रारदार यांच्या अहमदनगर येथील गोल्ड काऊन्सलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरू करण्यासाठी ,लागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे,संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात आलोसे क्रमांक एक व दोन यांनी प्रत्येकी १५०००/- (पंधरा हजार रुपये) याप्रमाणे एकूण ३०,००० (तीस हजार )रु लाचेची मागणी करून दि.२८/६/२०२२ रोजी पंचांसमक्ष प्रत्येकी १५,०००/- (पंधरा हजार )असे एकूण ३०,०००/-(तिस हजार रु)लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .
 
 हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. **सापळा अधिकारी* – अनिल बागूल पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. नाशिक *सापळा पथक:-* पो ना किरण अहिरराव ,पो.ना.अजय गरुड पो.ना.वैभव देशमुख.पो.ना.नितीन डावखर **मार्गदर्शक* -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिकमा.श्री नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.मा श्री सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
 
 आलोसे यांचे सक्षम अधिकारी :- मा.सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळमहाराष्ट्र राज्य , मुंबई .